शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2016 (16:22 IST)

तर हे आहे शाहरुख-आलियाच्या चित्रपटाचे नाव ... रिलीज डेटपण निश्चित

shrukh alia
शाहरुख खान आणि आलिया भट्टला घेऊन गौरी शिंदेने चित्रपट तयार केले आहे. यात शाहरुखचा रोल काही जास्त मोठा नाही आहे. चित्रपटाची शूटिंग समाप्त झाली आहे, पण अद्याप नाव निश्चित झालेले नाही आहे. युनिटाचे लोक बरेच नाव सुचवत आहे जसे - वॉक द वॉक किंवा प्रोजेक्ट 51, पण याला सहमती मिळाली नाही. शेवटी एक नाव समोर आले आहे आणि सर्वांच्या मते हे नाव चित्रपटाच्या स्क्रिप्टवर  सूट करत आहे.    
 
चित्रपटाला 'डियर जिंदगी' म्हणून हाक मारण्यात येणार आहे कारण यात आलिया भट्टच्या भूमिकेची यात्रा दाखवण्यात आली आहे. ती चार लोकांना भेटल्यानंतर शाहरुख खानला भेटते.   
 
जास्त करून लोक याला शाहरुख-आलियाचे चित्रपट समजत आहे, पण यात चार ऍक्टर्स अजून आहे. चित्रपटात आदित्य रॉय कपूर, अली ज़फर, अंगद बेदी आणि कुणाल कपूरसोबत आलिया डेटिंग करताना दिसणार आहे. यानंतर ती शाहरुखला भेटेल.   
 
चित्रपटासाठी अशी रिलीज डेट निवडण्यात आली आहे जेव्हा जास्त चित्रपटांची भीड राहणार नाही. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार 18 नोव्हेंबर निश्चित आहे. या दिवशी हे चित्रपट रिलीज होईल. 'फॅन' नंतर शाहरुखचे हे दुसरे चित्रपट आहे जे या वर्षी प्रदर्शित होईल.