सानियाचा जोडीदार बनण्याचे वेध
आता सानिया मिर्झाचा जोडीदार बनण्याचे वेध बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करणार्या शाहरुख खानला लागले आहेत. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी लिहिलेल्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी तो बोलत होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर सानिया भारताची लोकप्रिय खेळाडू बनली आहे.
सानियावर चित्रपट बनला तर तो खूपच रंजक असेल. यात तिच्या जोडीदाराची भूमिका करायला मिळेल का हे मी तिला विचारेन. पण मी हा चित्रपट नक्की निर्माण करेन, असे शाहरुख खान म्हणाला. शाहरुख पुढे म्हणाला, खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट मला आवडतात. ‘चक दे इंडिया’ मी केला आहे.
‘लगान’ मस्तच होता, ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’ हे चांगले चित्रपट होते. आता धोनीच्या जीवनावर चित्रपट बनत आहे. सध्या शाहरुख ‘रईस’ चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात तो आलिया भट्टसोबत झळकणार आहे.