सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2017 (11:28 IST)

'थ्री इडियट्स' चा मेक्सिकन भाषेत रिमेक

3 idiots in maxi can language
आमीर खानच्या यशस्वी आणि सुपरहिट  'थ्री इडियट्स' चित्रपटाचा रिमेक केला जात आहे. पण हा रिमेक हिंदी किंवा इतर भारतीय भाषेत नसून चक्क मेक्सिकन भाषेत तयार करण्यात आला आहे. कार्लोस बोलाडो यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातही तीन मित्रांची कहाणी असून अल्फांजो दोसाल, क्रिस्चियन वाज्क्वेज आणि जर्मन वाल्देज मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटातील करिना कपूरची भूमिका अभिनेत्री मार्था हाइगारेडाने निभावली आहे. या मेक्सिकन चित्रपटाचं नाव असणार आहे '3 idiotas'.