गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:46 IST)

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना

ada sharma
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या अभिनयाने आणि इन्स्टाग्रामवरील रीलमुळे चर्चेत असते. नुकताच अदाने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा मुंबईच्या रस्त्यांवरील कचरा उचलत रॅम्पवर चालताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ती कचऱ्याची तुलना तिच्या बॉयफ्रेंडशी करताना दिसत आहे. अभिनेत्री डस्टबिन सोबत रिल करताना दिसतेय. अदा कचरा अनोख्या स्टायलने उचलताना दिसतेय.
अदा सोशल मिडियावर aचांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ या सिनेमामधून अदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानंतर तिने मागे वळून पाहिल नाही. ‘हंसी तो फसी’, ’कमांडो 3’ सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.