1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. aamir-khan-fans-sequel-to-3-idiots-is-on-its-way

'3 इडियट्स' चा सीक्वल येणार

आता लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. या सिनेमांत इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या 3 जिगरी मित्रांची गोष्ट सांगण्यात आली आहे. रेंचो, फरहान आणि राजू अशी या तिघांची गोष्ट आहे.
 
एका मुलाखतीत राजकुमार हिरानी  यांनी नक्कीच 3 इडिएट्सचा सिक्वल बनवणं माझ्या डोक्यात आहे. अभिजात जोशी आणि मी काही दिवसांपूर्वी याची स्टोरी लिहायला सुरूवात केली आहे. मात्र आता हा सिनेमा अगदी सुरूवातीच्या काळात आहे. स्क्रिप्ट डेव्हलप करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागणार आहे असे सांगितले.
पुढील लेख
प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न