1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2024 (14:42 IST)

लग्नात सिगारेट ओढताना दिसली आमिर खानची लेक इरा!

सध्या बॉलिवूडचे अभिनेता इरा खान चर्चेत आहे. 3 जानेवारी रोजी तिने नुपूर शिखरे सोबत कोर्ट मॅरेज केली. नंतर त्यांनी कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये उदयपूरच्या ताज पॅलेस मध्ये ग्रॅन्ड लग्न केले. या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मोडियावर व्हायरल होत असून तिच्या प्री वेडिंगचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तिचा सिगारेट ओढतानांचा फोटो चांगलाच चर्चेत येत असून तिला ट्रोल केले जात आहे. 

युजर्स लिहितात की हे लोक खूप असंस्कारी आहेत, एकाने लिहिले ही वाईट सवय आहे. एकाने लिहिले आमिरची मुलगी असून सिगारेटला प्रमोट करते. 

इराने आपल्या सोशल अकाउंटवर लग्नाचे आणि प्री वेडींगचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोतील सिगारेट ओढतानाच्या फोटोसाठी तिला ट्रोल केले जात आहे. 

इराने नुपूर शिखरे सोबत लग्न केले आहे. नुपूर हा जिम ट्रेनर आहे. त्यांची प्रेम कथा 2020 पासून सुरु झाली. त्यांनी आपल्यातील नात्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. आता त्यांनी लग्न केले. 
Edited by - Priya Dixit