शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:34 IST)

आमिरच्या लेकीच्या लग्नाची जय्यत तयारी

Ira Khan-Nupur Shikhare
सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. लवकरच इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. इरा अन् नुपूरच्या केळवणाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
अगदी मराठमोळ्या पद्धतीने दोघांचे केळवण पार पडले. आता दोघांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून आमिरचे घर देखील नववधूसारखे सजले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, इरा आणि नुपूर उद्या ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. यानुसार आज इरा आणि नुपूरच्या हातावर मेंदी रंगणार आहे.
 
विरल भयानीने इरा खानच्या लग्नाच्या ठिकाणाचा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये दिसतेय इरा अन् नुपूर ज्या ठिकाणी लग्नबंधनात अडकणार आहेत ते ठिकाण दिवे आणि रोषणाईने न्हाऊन निघाले आहे. हा व्हीडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे इराच्या लग्नाचे ठिकाण आहे आणि आज आमिर खानच्या मुलीचे लग्न आहे. दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार आहेत.
 
वधू इरा खानचे वडील आमिर खान यांनी त्यांचे मुंबईतील घर सजवले आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हीडीओ व्हायरल होत आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर हे कपल १० जानेवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शनला चित्रपट जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती येणार असल्याचे बोलले जात आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor