शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2024 (11:40 IST)

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

aamir khan jhund
अभिनेता आमिर खान 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा दर्शील सफारीसोबत दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांनाही याची खूप उत्सुकता आहे. 'तारे जमीन पर' फेम दर्शील सफारी देखील सितारे जमीन पर या चित्रपटात दिसणार आहे.  
 
दर्शीलने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये आमिर विमान उडवताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत आमिर आदिमानवाच्या भूमिकेत तर तिसऱ्या फोटोत तो अंतराळवीराच्या भूमिकेत दिसत आहे. 
 
आमिर खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे थोडे विचित्र आहेत. या फोटोंमुळे  चाहते घाबरले आहे. 

व्हायरल फोटो मध्ये आमिरचे केस विस्कटलेले आहे. चेहऱ्यावर घाण लागली आहे, दात काळे आणि  घाण दिसत आहे. आमिरचा असा नवा लूक पाहून चाहते घाबरले आहे. 

आमिरला शेवटचे करीना कपूरसह लाल सिंग चड्ढा मध्ये बघितले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला. 'तारे जमीन पर'मध्ये इशान अवस्थीची भूमिका साकारणारा बालकलाकार दर्शील सफारी16 वर्षांनंतर पुन्हा काम करत आहेत. आता सीतारे जमीन पर'बाबत चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
 
Edited by - Priya Dixit