मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2024 (11:11 IST)

अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई

Actress Katrina Kaif is going to be a mother
अभिनेत्री दीपिका पदुकोण गरोदर असल्याच्या बातमी नंतर आता कतरीना कैफ लग्नाच्या तीन वर्षा नंतर आई होणार असल्याची चर्चा सुरु आहे. कतरिनाच्या एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे ती गरोदर असल्याची चर्चा सुरु आहे. 

गुजरातच्या जामनगर मध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चन्टचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती लावली होती. तीन दिवस चाललेल्या या लग्न सोहळ्यामध्ये कतरीना कैफ व विकी कौशल ने हजेरी लावली होती.

लग्नानंतर सर्व कलाकार पुन्हा मुंबईला रवाना झाले असून जामनगरच्या विमानतळावर अनेक कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून या मध्ये कतरिना व विकी कौशलच्या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.व्हायरल व्हिडीओ मध्ये कतरिनाने बेबी पिंक कलरचा अनारकली कुर्ता घातला होता सोबत खांद्यापासून पोटापर्यंत ओढणी घेतली होती. विकीने डेनिम शर्ट व जीन्स घातले होते. कतरिना ओढणीने बेबी बंप लपवण्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ती गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. तिने पोटावर हात ठेवला होता.या व्हिडिओवर वर चाहते कॉमेंट्स करत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit