गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (12:39 IST)

गायक अभिजीतकडून महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट्स, अकाऊण्ट सस्पेंड

महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट्स केल्याप्रकरणी ट्विटरकडून पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्यचे अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे. अनुचित भाषेचा वापर करत अपमानकारक ट्वीट केल्याची तक्रार सोशल मीडिया युझर्सनी केल्यानंतर ट्विटरकडून त्याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हँडल बंद करण्यात आलं. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्याने हे अकाऊण्ट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलं.

“Account Suspended: Twitter suspends accounts that violate the Twitter Rules” असा संदेश त्याच्या ट्विटर हँडलवर दिसत आहे. @abhijeetsinger हे त्याचं ट्विटर अकाऊण्ट व्हेरिफाईड होतं.