1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (08:49 IST)

वादग्रस्त ट्विट प्रकरणी “या” अभिनेत्याला मुंबई विमानतळावर अटक

Actor Kamal Rashid Khan arrested by Malad police in connection with controversial tweet Bollywood Gossips Marathi News In Bollywood Marathi
मुंबई : वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता कमाल रशीद खानला मालाड पोलिसांनी अटक केली आहे.मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अभिनेता आणि समीक्षक असलेला केआरके सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याआधी त्याने क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त ट्विट केले होते. बॉलिवूड चित्रपटांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरुन तो नेहमी चर्चेत असतो. केआरके याने नुकतेच ट्विटर हँडलवरील नाव बदलून कमाल राशिद कुमार असे केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये कमाल खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केआरकेने अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्याने अनेक प्रोजेक्ट्सची निर्मितीही केली आहे.

तो बिग बॉसचाही भाग राहिला होता. केआरकेने सलमान खानच्या राधे चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण केले होते. यामुळे सलमानने केआरके विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला होता.