शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2017 (16:54 IST)

अभिनेता इंदर कुमारचे निधन

अभिनेता इंदर कुमारचे  (४३)  हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. सध्या तो ‘फटी पडी है यार’ चित्रपटाचं शूटिंग करत होता.

एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या मालिकेत 20 वर्षांच्या लीपनंतर त्याने मिहीर विरानी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र काही महिन्यांतच त्याने मालिका सोडली.