शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (22:34 IST)

Gayatri Pandit Passes Away : अभिनेते राज कुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन

बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. 

गायत्री पंडित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गायत्री पंडित आणि राजकुमार यांची भेट एका फ्लाईट मध्ये झाली. गायत्री या एअरहोस्टेस होत्या त्यांचे नाव जेनिफर असून त्या अँग्लोइंडियन होत्या. राजकुमार यांनी जेनिफर यांचे नाव बदलून गायत्री कुमार केले आणि हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यांना तीन अपत्य झाले. मुलगा पुरु राजकुमार, मुलगी पाणिनी राजकुमार,वास्तविकता पंडित.गायत्री पंडित यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

राज कुमार हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. आपल्या अभिनयाने त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे. आज जरी ते आपल्यात नसले तरी ते आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहेत. राजकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान कधीही विसरता येणार नाही. अभिनेता राजकुमार यांचे 3 जुलै 1996 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. 
 
Edited by - Priya Dixit