1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (12:21 IST)

Randeep Hooda :अभिनेता रणदीप हुडा हनिमूनच्या फोटो मुळे ट्रोल

randeep hooda
नुकतेच विवाहित अभिनेते रणदीप हुड्डा आणि लीने लैश्राम यांनी केरळमधील कन्नूर येथे त्यांचे पहिले नवीन वर्ष एकत्र साजरे केले. लव्हबर्ड्सने त्यांच्या नवीन वर्षाच्या सुट्टीची झलक सोशल मीडियावर शेअर केली. फोटोमध्ये, रणदीप आणि लिन सूर्यास्ताच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर उभे असताना सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहेत. रणदीपने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नी लिन लैश्रामसोबतचे दोन सुंदर फोटो शेअर केले. त्याला कॅप्शन दिले, "2023 चा शेवटचा सूर्यास्त." दोघे पूलचा आनंद लुटताना आणि सुंदर सूर्यास्त पाहताना दिसले.
 
अभिनेत्याने शर्टलेट आणि शॉर्ट्स घातले होते, तर लिनने मोनोकिनी घातली होती. पोस्टला कॅप्शन दिले होते - "2023 चा शेवटचा सूर्यास्त." रणदीपच्या पोस्टमध्ये 'सूरज डुबा  हैं' गाण्याची साथ होती.या फोटोमुळे रणदीप ट्रोल होत आहे. 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे कुटुंबातील सदस्य आणि काही मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक मेईतेई समारंभात या जोडप्याने लग्न केले.
 
वर्क फ्रंटवर, रणदीप आणि लिन दोघेही त्यांच्या व्यावसायिक बांधिलकींमध्ये व्यस्त आहेत. लिन तिच्या 'बन टिक्की' चित्रपटाचे शूटिंग करत असताना, रणदीप त्याच्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे.
Edited by - Priya Dixit