रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (15:51 IST)

अभिनेता विवेक ओबेरायने केलेला स्वतःला संपवण्याचा विचार

Vivek Oberoi
बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 20 लोकांमध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा समावेश होता. अलीकडेच त्याने  दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सुशांत आणि मानसिक आरोग्याबाबद्दल सांगितलं तो देखल फार वाईट काळातून गेला असून त्याच्या मनात देखील आत्महत्या करण्याचा विचार आला होता. 

सुशांत एक चांगला आणि प्रतिभावान मुलगा होता. त्याच्या निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली होती. मी त्या 20 पैकी एक होतो. मी त्याच्या वडिलांना रडताना पहिले आहे. सुशांतला शांत निजलेला पाहून मी फक्त एवढा विचार करत होतो .की मित्र बघ तुझ्या आयुष्यातून अशा पद्द्धतीने निघून जाण्याने तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची काय अवस्था झाली आहे. हे तुला समजलं असत तर कदाचित तू असे केले नसते. 

मी देखील वाईट काळातून गेलो आहे. त्यावेळी माझ्या मनात देखील असं काही येत होत. पण मी नशीबवान आहे कि मला माझ्या कुटुंबीयांनी अशा काळात खंबीरपणाने साथ दिला. मी त्यावेळी आईच्या कुशीत जाऊन रडायचो.
आईला विचारायचो माझ्याच बाबतीत असं का घडलं. आई म्हणाली तुला जेव्हा नाव आणि प्रसिद्धी मिळाली तेव्हा तू असा विचार का केला नाही?.
 
विवेक ओबेरॉयने रोहित शेट्टीच्या 'द पोलिस फोर्स' या मालिकेतून 2 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. या मालिकेत शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील आहे. 

Edited by - Priya Dixit