गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 7 एप्रिल 2024 (12:34 IST)

अभिनेत्री आरती छाबरिया वयाच्या 41 व्या वर्षी आई बनली

2001 मध्ये 'लज्जा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री आरती छाबरिया ही सध्या चर्चेत आहे. हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ती गरोदर असल्याची चांगली बातमी दिली आहे. मात्र तिने महिन्याभरापूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने 4 मार्च 2024 रोजी मुलाला जन्म दिले. अभिनेत्रीने तिची गर्भधारणा जगापासून का लपवली जाणून घ्या.

अभिनेत्री म्हणाली की तिच्या मुलाच्या जन्मापूर्वी तिचा गर्भपात झाला होता. या कारणास्तव तिने गर्भधारणाची बातमी लपवून ठेवली. मी पण माणूसच आहे.  वयाच्या 41 व्या वर्षी हे सगळं करणं सोपं नसत. लोकांचं म्हणणं आहे की ही तर एक कलाकार आहे त्यामुळे हिच्यासाठी हे सगळं करणं सोपं असेल ,पैसे देऊन होईल. असं नाही ही ट्रीटमेंट तुमच्या शरीरावर परिणाम करते. माझ्या शरीराचा आकार वेगळा दिसत आहे. चीन डबल होत आहे. हे सगळं काही मी घेत असलेल्या गोळ्यांमुळे होत आहे. 

मी कोव्हिडच्या काळात आस्ट्रेलिया मध्ये अडकलो. हे खूपच तणावाचं असून या मध्ये गर्भधारणा करणं कठीण होत. माझा या काळात गर्भपात झाला. माझ्यासाठी तो काळ फार वाईट होता. पण माझ्या मुलाच्या युवानच्या जन्मानंतर असं वाटत आहे जणू माझ्या सर्व काही अडचणी दूर झाल्या. 
आरतीने आवारा पागल दिवाना, मिलेंगे मिलेंगे, हे बेबी या चित्रपटात काम केले असून तिने बिडासीशी लग्न करून ऑस्ट्रलिया स्थायिक झाली. 

Edited By- Priya Dixit