रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (13:13 IST)

अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच गोड बातमी देणार ?

सध्या अभिनेत्री काजल अग्रवाल बद्दल सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. जेव्हापासून काजलने गौतम किचलूशी लग्न केले तेव्हापासून चाहते तिच्याबद्दल सर्व प्रकारचे अंदाज लावत आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ही अभिनेत्री अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच काजलने रविवारी मित्रासोबत लंच आऊटिंगचे फोटो शेअर केले आहेत.
काजल अग्रवालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. बेज बॉडी कॉन आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. मात्र, काजलच्या बाजूने अद्याप अधिकृत दुजोरा आलेला नाही. पण चाहत्यांना आशा आहे की हे जोडपे लवकरच काही चांगली बातमी देऊ शकेल.
गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर 2020 रोजी काजलने तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन गौतम किचलूसोबत मुंबईत ग्रँड वेडिंग केले होते. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले .