जया बच्चन यांचा भाजपवर संताप, भर राज्यसभेत म्हणाल्या, 'मी तुम्हाला शाप देते...'
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि भाजपचे खासदार यांच्यात राज्यसभेच्या सभागृहात शाब्दिक बाचाबाची झाली.
"लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत. मी शाप देते," असं जया बच्चन भाजप खासदारांना उद्देशून म्हणाल्या. भाजप खासदारांनी काही खासगी विधानं केल्याचं जया बच्चन यांचं म्हणणं आहे.
सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी ऐश्वर्या रॉय यांच्यावर काही विधानं केल्याचं जया बच्चन यांचं म्हणणं आहे.
राज्यसभेतील गोंधळानंतर जया बच्चन बाहेर आल्या आणि माध्यमांसमोर म्हणाल्या की, "असं व्हायला नको होतं. मी कुणावरही वैयक्तिक विधान करू इच्छित नाही. मात्र, ज्याप्रकारे वैयक्तिक गोष्टी बोलल्या गेल्या, त्यामुळे मी नाराज झाले होते."
पनामा पेपर्सप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय ऐश्वर्या राय यांची दिल्लीत चौकशी केली.
अंमलबजावणी संचलनालयानं ऐश्वर्या राय यांना नोटीस दिली होती. मात्र, दोनवेळा त्या हजर राहू शकल्या नाहीत.
पनामा पेपर्स लीकमध्ये भारतातील 500 हून अधिक नागरिकांची नावं आहेत. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर, अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी बेकायदेशीरपणे परदेशात पैसा ठेवल्याचा आरोप केला गेला आहे.
दरम्यान, ईडीसमोर हजर झाल्यानंतर ऐश्वर्या राय घरी परतली.