शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (11:44 IST)

अभिनेत्री काजोलची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह

Actress Kajol's Covid-19 test positiveअभिनेत्री काजोलची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह Bollywood Gossips Marathi Bollywood Marathi News  In Webdunia Marathi
देशात अजूनही कोरोनाची भीतीदायक आकडेवारी समोर येत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने कोरोनाशी संबंधित सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही स्टार्स याच्या विळख्यात आले आहेत. अभिनेत्री काजोलने तिची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची पोस्ट पोस्ट केली आहे. ती आपल्या मुलीला न्यासाला खूप मिस करत आहे.  सध्या काजोल आयसोलेशनमध्ये आहे. काजोलने मुलगी न्यासाचा फोटो शेअर करत कोरोना असल्याची माहिती दिली आहे. प्रियांका चोप्राने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. 
काजोल लिहिते, माझी कोरोनाची 'चाचणी पॉझिटिव्ह आली आणि मला रुडॉल्फ प्रमाणे माझे लाल नाक दाखवायचे नाही म्हणून मी जगातील सर्वात सुंदर स्माईल शेअर करत आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे न्यासा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

18 वर्षीय न्यासा सध्या स्वित्झर्लंडमध्ये हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी न्यासाने तिचे शालेय शिक्षण सिंगापूरमधून केले आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किडपैकी एक आहे.
काजोल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर काजोलचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.