बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (17:17 IST)

अभिनेत्री करीना कपूर खान यांना कोरोनाची लागण

अभिनेत्री करीना कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून पॉझिटिव्ह आले आहेत.तेव्हा पासून त्यांनी स्वतःला वेगळे केले आहे. यापूर्वी बहीण करिश्मासोबत करीना कपूरही करण जोहरच्या घरी पार्टीला गेली होती. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करणच्या घरी पार्टी करण्यात आली.
तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी खबरदारी म्हणून स्वतःला वेगळे केले आहे. बीएमसीने सर्वांना चाचणी करवून घेण्यास सांगितले आहे. आज 13 डिसेंबर रोजी
करीना कोविड पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली आहे. बीएमसीने करीनाला कोरोना असल्याची पुष्टी केली आहे. तर  तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची RTPCR चाचणी करून घेण्यासही सांगण्यात आले आहे.