बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (08:13 IST)

अभिनेत्री रकुलप्रीतचा भाऊ अमनप्रीत अडचणीत,ड्रग्ज प्रकरणात अटक

arrest
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंगच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला सोमवारी हैदराबाद पोलिसांनी एका कथित ड्रग्ज प्रकरणात अटक केली.

सायबराबाद पोलिसांच्या अखत्यारीतील नार्कोटिक्स ब्युरो आणि राजेंद्र नगर एसओटी पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्यानंतर त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिस पथकाने ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आणि अमन प्रीत सिंगसह 30 ग्राहकांची ओळख पटवली.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अमन प्रीत सिंग व्यतिरिक्त, अनिकेत रेड्डी, प्रसाद, मधुसूदन आणि निखिल दमन अशी अटक केलेल्या इतरांची नावे आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांना ग्राहक म्हणून पकड्ण्यात आले आहे. 
लघवी तपासणी किटमध्ये ते सर्व पॉझिटिव्ह आढळले. आता आम्ही त्यांना सविस्तर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवत आहोत. 

यापूर्वी रकुल प्रीत सिंगला 2022 आणि 2021मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडी गेल्या चार वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणाचा तपास करत आहे. 2017 मध्ये तेलंगणा दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने उच्च दर्जाच्या ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केल्यानंतर तपास सुरू झाला.
 
Edited by - Priya Dixit