अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन
मराठी, हिंदी चित्रपटात तसेच हिंदी नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा स्वंतत्र ठसा उमटवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (वय ७९) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या अविवाहित होत्या.
गेल्या दीड वर्षापासून बावकर या पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
बावकर या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांच्या तालमीत तयार झालेल्या त्या अभिनेत्री होत्या. त्यांनी दिल्ली येथील रंगभूमीवर ऑथेल्लो, गिरीश कर्नाड यांच्या “तुघलकसह अनेक नाटकांत काम केले होते.
जयवंत दळवी यांच्या “संध्या छाया नाटकाचे “कुसुम कुमार या नावाने हिंदीत रुपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Published By -Smita Joshi