रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (07:34 IST)

विनोद तावडे यांच्या आई विजया तावडे यांचं निधन

vinod tawde
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे. विजया श्रीधर तावडे असं विनोद तावडे यांच्या आईचं नाव असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
 
विनोद तावडे यांच्या आई विजया तावडे यांचं सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी ९ वाजता अमृत एन्क्लेव्ह, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor