संबंधित माहिती
- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाची डी. लिट पदवी मिळाली
- पुणे-मुंबई प्रवास महागणार; 1 एप्रिलपासून टोल दरवाढ
- ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा खोल दरीत पडून मृत्यू
- Rathi Murder Case Pune : काळजाचा थरकाप उडवून देणारे पुण्यातील राठी हत्याकांड पूर्ण माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन
भाजपचे पुण्याचे खासदार ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश बापट यांचं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते 73 वर्षाचे होते. ते गेल्यावर्षापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. आजारी असताना देखील कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी प्रचार केला. ते महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचे सदस्य होते. कसबा पेठ मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांची 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवड झाली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली होती. नुकतंच त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कसबापेठ भाजपचा बालेकिल्ला असून याला घडवायचे कार्य देखील बापटांनी केले होते. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ समशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
Edited By- Priya Dixit
