सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (12:43 IST)

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

girish bapat
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असून ते ICU मध्ये भरती असून व्हेंटिलेटरवर आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ते गेल्यावर्षीपासून फुफ्फुसाच्या रोगाने आजारी आहे.  

कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते बाहेर पडले होते. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावत गेली. आज त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाकडून काही वेळातच त्यांच्या तब्बेती विषय अपडेट देण्यात येईल असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. 
Edited By- Priya Dixit