रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (16:31 IST)

ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा खोल दरीत पडून मृत्यू

death
लिंगाणा किल्ला जिल्हा रायगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी दहावाजेच्या सुमारास घडली आहे. अजय काळे असे या मयत पर्यटकाचे नाव आहे. अजय हे ट्रेकिंग करणाऱ्या एका गटासोबत आले होते. मुंबईवरून येणाऱ्या ट्रेकिंगच्या गटातील ते ज्येष्ठ ट्रेकर असून त्यांना अनुभव देखील होता. ट्रेकिंगसाठी काही नागरिकांचा गट लिगांणा किल्याच्या पायथ्याशी आला होता. ट्रेकिंग करताना अजय यांना चक्कर आली आणि ते 400 फूट खोल दरीत कोसळले.
दरी खोल असल्यामुळे त्यांच्या पर्यंत मदत पोहोचू शकली नाही. आणि त्यांना वाचविण्यात अपयश आले. 
 
Edited By- Priya Dixit