शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (07:05 IST)

Adipurush Controversy: आदिपुरुष'चा वाद चिघळला, मनोज मुंतशीरला पोलिसांनी दिले संरक्षण

प्रभास स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट सतत वादात असतो. चित्रपटाच्या टीझरच्या वेळेपासून सुरू झालेला हा गोंधळ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सुरूच आहे. चित्रपटाचे डायलॉग ऐकून लोक 'आदिपुरुष'ला कडाडून विरोध करत आहेत. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. या चित्रपटावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसह राजकारण्यांनी निशाणा साधला आहे. 
 
वाढता वाद पाहून मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
16 जूनला रिलीज झालेला 'आदिपुरुष' पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्याचे डायलॉग्स अजिबात आवडले नाहीत. संवादाच्या भाषेवर लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, चित्रपटाचे लेखक मनोज यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्याचे संवाद आजच्या प्रेक्षकानुसार लिहिले गेले आहेत, तेव्हा या विधानावर लोक संतापले. 
 
600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि सनी सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्व वादांच्या दरम्यान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. 
 
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण 241 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात तो 300 कोटींचा आकडा गाठू शकतो, असे मानले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. यापूर्वी त्याने 'ताना जी - द अनसंग वॉरियर' सारखा सुपरहिट चित्रपट केला आहे.
 
 
Edited by - Priya Dixit