गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (18:13 IST)

आदिपुरुष: 'पिक्चर आहे की व्हीडिओ गेम, कार्टून चॅनेलवर दाखवा'; आदिपुरुषच्या टिझरचं जोरदार ट्रोलिंग

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टिझर रविवारी रात्री प्रदर्शित झाला.
या सिनेमात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च करण्यात आला. परंतु टिझर पाहून नेटिझन्सची निराशा झाली आणि मीम्सना उधाण आलं.
 
चित्रपटाची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्यामध्ये पोहोचली होती. दिग्दर्शक ओम राऊत यांनी लोकमान्य टिळकांवर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
 
ओम यांनी दिग्दर्शित केलेल्या तान्हाजी चित्रपटाला 68व्या व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
 
दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट रामायणावर बेतलेला आहे. प्रभास हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर क्रीती सनोन ही सीतेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
 
दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार अशी प्रतिमा असलेल्या प्रभासवरही टीका होत आहे. बाहुबली चित्रपटामुळे प्रभासचं नाव संपूर्ण देशभरात पोहोचलं होतं.
 
लष्करी पद्धतीप्रमाणे केस कापलेला, केसांचं स्पाईक्स आणि दाढीला विशिष्ट आकार देण्यात आलेला रावण असं नेटिझनने म्हटलं आहे. सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपटात मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या चित्रपटाची तुलना हॉलिवूड आणि इतर देशातल्या बऱ्याच चित्रपटांशी केली जात आहे.
 
नेटिझन्सनी टिझरचे स्क्रीनशॉट टिपून तंत्रातल्या त्रुटी दाखवून दिल्या आहेत. आधुनिक काळात अद्ययावत तंत्रज्ञान हाताशी असतानाही सर्वसाधारण दर्जाचं कंटेट तयार केल्याने नेटिझन्सनी झोडपून काढलं आहे.
 
पैसे आणि तंत्रज्ञान तुटुपंजे असतानाही रामानंद सागर निर्मित रामायण यापेक्षा कैक पटींनी चांगलं असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.
आदिपुरुषकडून खूप अपेक्षा होत्या पण हे म्हणजे व्हीडिओ गेमचं ग्राफिक्स वाटतंय असं अनेकांनी म्हटलंय.
आदिपुरुषचा टिझर पाहून टेंपल रन गेमची आठवण झाली.
गेम ऑफ थ्रोन्सची सरसकट कॉपी असं अनेकांनी वर्णन केलं आहे.
टिझर पाहून या सिनेमाचे हक्क पोगो या कार्टून दाखवणाऱ्या वाहिनीने घेतले असं उपहासाने एका नेटिझनने म्हटलं आहे.
लंकापुरी असेल असं वाटलं होतं, हा चारकोलचा सेट आहे असं एका नेटिझनने म्हटलं आहे.