शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (13:17 IST)

अपघातानंतर गोविंदाने डॉक्टरांचे आभार व्यक्त केले, चाहत्यांना दिले धन्यवाद

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या आज मंगळवारी सकाळी अपघात झाला त्यांच्या पायाला परवाना असलेली त्यांची रिव्हॉल्वर केसमध्ये ठेवताना गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी पायातली गोळी काढली आहे. आता त्यांची प्रकृती बरी आहे.

अपघातानंतर त्यांनी एक निवेदन दिले आहे त्यात त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे तसेच त्यांनी चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. 

ते म्हणाले, 'नमस्कार, मी गोविंदा आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचे आशीर्वाद. त्याला गोळी लागली. पण, गुरूंच्या कृपेने गोळी काढली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थनांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. 

पोलिसांनी त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी अभिनेता आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहे. सध्या ते आयसीयू मध्ये आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून ते धोक्या बाहेर आहे. अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी सुनीता घरात नव्हती. गोविंदा कोलकात्याला जाणाच्या तयारीत असताना हा अपघात घडला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. 
Edited by - Priya Dixit