रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐश्वर्याला साकारयचीय मराठीत भूमिका

ऐश्वर्या रॉय- बच्चन हिने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विक्रम फडणवीस दिग्दर्शित मराठी सिनेमा हृदयांतरच्या म्युझिक लॉन्चप्रसंगी ऐश्वर्या उपस्थित होती, यावेळी तिने आपली इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमात तुला मराठी सिनेमात काम करायला आवडेल का? अशा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर आपल्याला निश्चित आवडेल असे उत्तर तिने दिले. तसेच हा प्रश्न जनतेसमोर आणि मीडियासमोर विचारल्याबद्दल तिने आभारही मानले.
 
43 वर्षीय ऐश्वर्याने आपल्या करिअरची सुरूवात 1997 मध्ये तमिळ फिल्म इरुवरने केली होजी. मी एक अभिनेत्री आहे त्यामुळे मी कुठल्या भाषेतील सिनेमा करायला हवा यावर बंधन असण्याचे कारण नाही असे ऐश्वर्या म्हणते. लग्नानंतर 2015 मध्ये जज्बा या सिनेमाद्वारे ऐश्वर्याने बॉलीवूडमध्ये कमबॅक केले होते. ठराविक भूमिकांचे शिक्के लागून राहतील अशा भूमिका तिने स्वीकारलेल्या नाहीत. माझा सिनेसृष्टीत प्रवास मी स्वत: निवडलेला असून माझ्या करिअरमधून ते एव्हाना सिद्धही झाले असल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे चांगली कथा आणि मला भावेल अशी भूमिका असेल तर मराठीच काय इतर कुठल्याही भाषेतून सिनेमा करायला मला आवडेल ‍असे तिने म्हटले आहे.