गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (18:45 IST)

Singham Again Trailer:अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ऑक्टोबरमध्ये या दिवशी रिलीज होणार!

रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही काळापूर्वी जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही समोर आली आहे.

सिंघम अगेन या चित्रपटाचा ट्रेलर ऑक्टोबरमध्येच येणार असून  गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये आलेल्या सिंघम अगेन चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि त्यानंतरच दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याचा दुसरा भाग प्रदर्शित केला. जो एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. आता त्याचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन 1 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. 
 
सिंघम अगेन हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूरसारखे दिग्गज कलाकार आहेत. तब्बू देखील या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याचे ऐकले आहे, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Edited By - Priya Dixit