बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (15:18 IST)

Alia Bhatt Delivery आलिया भट्टची डिलिव्हरीची तारीख ही असू शकते

Alia Bhatt Delivery Date
आलिया भट्ट लग्नानंतर लगेचच प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. आलिया नोव्हेंबरमध्ये आई होणार असल्याचे सांगितले जात असले तरी तारखेबाबत कोणतीही माहिती नाही. तरी एका सूत्राने ETimes ला सांगितले की आलियाच्या बाळाचा जन्म 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होऊ शकतो.
 
असेही सांगण्यात आले आहे की डिलिव्हरीची तारीख आलिया भट्टची बहीण शाहीन हिच्या वाढदिवसाच्या आसपास असू शकते. शाहीनचा वाढदिवस 28 नोव्हेंबरला येतो. आलियाने तिच्या प्रसूतीसाठी मुंबईच्या एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल आधीच बुक केले आहे.
 
दरम्यान आलिया- रणबीरचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर 4 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.