शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (15:06 IST)

दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन, ज्यांनी गोविंदाला लॉन्च केले

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते इस्माईल श्रॉफ यांचे बुधवारी रात्री उशिरा वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून आजारी होते. चित्रपट निर्मात्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. फिल्ममेकर इस्माईल श्रॉफ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'बुलंदी', 'थोडी सी बेवफाई', 'सूर्या' आणि 'आहिस्ता-आहिस्ता' सारखे हिट चित्रपट दिले.
 
 
इस्माईल श्रॉफ यांनी गोविंदाला इंडस्ट्रीत ब्रेक दिला. गोविंदाचा पहिला चित्रपट लव्ह 86 हा इस्माईल श्रॉफ यांनी दिग्दर्शित केला होता. 
 
चित्रपट निर्मात्याच्या निधनाने धक्का बसलेल्या गोविंदाने ई-टाइम्सला सांगितले की, 'मी खूप दुःखी आहे, माझ्या करिअरची सुरुवात त्यांच्या चित्रपटापासूनच झाली. त्यांना स्वर्ग मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांनी मला फक्त कामच दिले नाही तर माझ्यावर विश्वासही ठेवला. माझ्या आयुष्यातला ते पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी गोविंदाला सिनेमा समजतो असे सांगितले. मला गोविंद ते गोविंदा बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.