शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2023 (15:14 IST)

आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचे निधन

Alia Bhatt Nana Narendranath Razdan Dies मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राजदानचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे गुरुवारी वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
 
सोनी राजदानने तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली.
 
त्यांना "उत्साही गोल्फर, संगीत प्रेमी आणि आमच्या जीवनाचा प्रकाश" असे संबोधून अभिनेत्री सोनी रझदानने लिहिले की त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यासारख्या दयाळू आणि प्रेमळ व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे.
 
पेशाने वास्तुविशारद असलेले नरेंद्रनाथ राजदान यांचे त्यांच्या 95 व्या वाढदिवसाच्या 15 दिवसांपूर्वी निधन झाले. 
 
आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आजोबांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt