बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (17:31 IST)

आलिया-रणबीरची मुलगी राहाची झलक दिसली

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जेव्हापासून आई-वडील झाले, तेव्हापासून ते त्यांची मुलगी राहासाठी चर्चेत आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांची मुलगी राहाचा चेहरा उघड केलेला नाही. मात्र, अनेकदा आलिया सोशल मीडियावर तिच्या मुलीची झलक दाखवत असते. आलिया भट्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती राहा कपूरला आपल्या कडे वर घेतलेली दिसत आहे.
 
व्हायरल भयानीच्या पेजवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहासोबत आलिया भट्ट दिसत आहे. आलियाला कल्पना नाही की तिचा व्हिडिओ बनवला जात आहे. व्हिडिओमध्ये लहान राहा आई आलियाच्या कडेवर असल्याचे तुम्ही पाहू शकता. कदाचित आलिया राहासोबत कुठेतरी जाण्याची तयारी करत असेल. व्हिडीओमध्ये राहाचा चेहरा अस्पष्ट दिसत असला, तरी तिच्या चेहऱ्याचा थोडासा भाग दिसतो. व्हिडीओमध्ये राहा फ्रॉक आणि दोन वेण्या घातलेली दिसत आहे
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, “राहाचे दोन सुंदर पोनीटेल”. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, “मीडिया इतका घाबरला आहे की चेहराही अस्पष्ट होतो”. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “राहा आता मोठी मुलगी झाली आहे. किती क्यूट दिसत आहे ती.


Edited by - Priya Dixit