मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (14:37 IST)

रणबीरचच्या अपार्टमेंटमध्ये आलियाचा नवा फ्लॅट

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यातले नाते आता नवे राहिले नाही. सोशल मीडियावर दोघांनीही या नात्याची कबुली दिली आहे. हे दोघे इतके एकत्र दिसू लागले होते की, त्यांनी या नात्याला कबुली दिली नसती तरी अनेक गोष्टी लोकांना दिसत होत्याच. आता आणखी एक बातमी रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांना  सुखावून जाणार आहे. ती अशी की, आलियाने बांद्राच्या पाली हिल भागात नवा फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत आहे 32 कोटी रुपये. आलियाने घेतलेला हा नवा फ्लॅट पाली हिलच्या वास्तू या अपार्टमेंटमध्ये  आहे. तब्बल दोन हजार चारशे साठ चौरस फुटांचा हा फ्लॅट आहे. या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर तर याच अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर रणबीरचा फ्लॅट आहे. आलियाने हा फ्लॅट घेतल्यानंतर त्याचे इंटेरिअर गौरी खानला करायला दिले आहे.
 
योगायोग असा की रणबीरच्या फ्लॅटचे इंटेरिअरही गौरीनेच केले आहे. आलियाची सध्या दोन घरे आहेत. एक जुहूला तिने बंगला घेतला आहे. तर लंडनमध्येही तिचे एक घर आहे. आता य फ्लॅटमुळे या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.