मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (20:20 IST)

अमिताभ बच्चन पुन्हा झाले आजोबा

अमिताभ बच्चन हे आजोबा तर झाले होते आज त्यांची पुतणी नैनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नैना ही अमिताभ यांचे धाकटे भाऊ अजिताभ यांची मुलगी आहे. नैना यांचे पती अभिनेता कुणाल कपूर यांनी सोशल मीडिया वर ही बातमी दिली. अभिनेता कुणाल कपूर आणि नैना बच्चन या दांपत्याच्या लग्नाला सात वर्षे झाली असून हे त्यांचे प्रथम अपत्य आहे. नैनाचे पती कुणाल कपूर यांनी आपल्या फॅन्सला ही बातमी इंस्टाग्रामद्वारे दिली. त्यांनी इंस्टावर नोट लिहिले आहे की, नैना आणि मी आई बाबा झालो आहोत. आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. या साठी मी देवाचे आभार मानतो. कुणालच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसह बॉलिवूडचे अनेक स्टार देखील शुभेच्छा देत आहे. 
नैना त्या बॉलिवूड पासून लांब राहतात आणि त्या श्वेता आणि अभिषेक बच्चनची चुलत बहीण आहे. या नात्याने अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत.