शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (15:52 IST)

अनन्या पांडेने सलग 23 तास केले शूटिंग

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूमडध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'पती, पत्नी और वो'मध्येही तिने काम केले. ती सध्या आपला आगामी सिनेमा 'खाली पीली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये आपल्या रोलमध्ये कोणती ही कमतरता राहू नये, यासाठी अनन्या काळजी घेते आहे. अलीकडेच तिने या सिनेमाच्या शूटिंगसाठी तब्बल 23 तास सलग काम केले.
 
आपल्या कामाच्या बाबत ती खूपच सिरीयस असते. सलग शूटिंगचे शेड्युल असले तर ती बिलकूल न कंटाळता आपले शूटिंग पूर्ण करते. एवढेच नव्हे, तर नरेशंन्स आणि इव्हेंटमधील सहभागही ती अजिबात चुकवत नाही. 'खाली पीली'च्या शूटिंगचे शेड्युल सकाळी 8 वाजता सुरू झाले होते. ते दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत हे शूटिंग सुरू होते. इतक्या व्यस्त शेड्युलनंतरही तिने त्याबाबत जराही त्रागा केला नाही किंवा तक्रारही केली नाही. अन्य वेळात ती आगामी सिनेमांच्या स्क्रीप्ट वाचत बसलेली असते. त्यापैकी काही सिनेमांचे शूटिंग पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. 'खाली पीली'मध्ये तिच्याबरोबर ईशान खट्टर असणार आहे. अनन्याकडे आणखी एक सिनेमाही आहे, त्याच तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण असणार आहेत.