रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (16:18 IST)

सासूच्या टोमण्यांमुळे चिडली अंकिता लोखंडे, सलमान खानसमोर दिले चोख उत्तर

Bigg Boss 17: ‘बिग बॉस 17’ महाअंतिम फेरी पार पडली. 105 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मुनावर फारुकीने 17 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. अंकिता लोखंडे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र बिग बॉसच्या संपूर्ण शोमध्ये अंकिता लोखंडेचा प्रवास खूप चर्चेत राहिला. कधी पती विकी जैनसोबतच्या भांडणामुळे तर कधी सासू-सासऱ्यांच्या टोमणेमुळे ही अभिनेत्री रडताना दिसली, पण ग्रँड फिनालेमध्ये अंकिता तिच्या सासूच्या टोमण्यांमुळे चिडली आणि तिने सलमान खानसमोरच त्यांना सडेतोड उत्तर दिले.
 
ग्रँड फिनालेच्या वेळी शोचा होस्ट सलमान खानने दोघांना अंकिता लोखंडे आणि तिची सासू यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष शपथ घेण्यास सांगितले. मात्र फिनाले एपिसोडमध्येही अंकिताची सासू मागे राहिली नाही. आपल्या सुनेच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी म्हटले की अंकिताने त्यांच्या मुलाशी चांगले वागावे आणि प्रेमाने जगावे अशी त्यांची इच्छा आहे.
 
अंकिताने सडेतोड उत्तर दिले
पुढे बोलताना अंकिताच्या सासूबाई म्हणाल्या की, तिने भविष्यात अशा कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ नये ज्यामुळे तिच्या कुटुंबाचे नाव बदनाम होईल. त्यांनी सांगितले की, 'तुम्ही कुटुंबाची इज्जत खराब होईल अशा कोणत्याही शोमध्ये भाग घेणार नाही असे वचन दे.' सासूच्या या वक्तव्याने अंकिता पुन्हा चिडली. ती म्हणाली, 'मम्मा, मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि मला याचा अभिमान आहे.'
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अंकिताच्या वागण्याने सासू-सासऱ्यांना त्रास होत होता
जेव्हा सलमान खानने अंकिताला तिच्या सासूबाईंना वचन देण्यास सांगितले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'माझं विकीवर खूप प्रेम आहे.'
 
अंकिताने विकीसोबत गैरवर्तन केल्याबद्दल तिच्या सासूची माफीही मागितली. विशेष म्हणजे शोदरम्यान अंकिता लोखंडेचं पती विकीला चप्पल मारणे आणि लाथ मारणे असे वागणे तिच्या सासूला अजिबात आवडले नव्हते. यामुळे अभिनेत्रीला खूप ऐकावे लागले होते.