अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत हळदी-कुंकूचा VIDEO VIRAL  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  अभिनेत्री अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली मकर संक्रात थाटात साजरी झाली. तिने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आपल्या कुटुंबासोबत आणि मैत्रिणींसोबत साजरी केली. या संबंधी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
				  													
						
																							
									  
	 
	प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडेच विवाह बंधनात अडकली आहे. तिने विकी जैनसोबत गेल्या महिन्यात लग्न केलं आहे. अंकिता लोखंडेच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत होती. त्यामुळे हा सण तिच्यासाठी खास होता आणि तिने या सणाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या कुटुंबातील स्त्रियांसोबत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करताना दिसून येत आहे. 
				  				  
	 
	महाराष्ट्रामध्ये मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकूचा समारंभ करतात या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडेने काळया आणि लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली असून परंपरेनुसार सुंदर हलव्याचे दागिने घातले आहेत. या व्हिडीओमध्ये ती आईसोबत आपली मैत्रीण आणि अभिनेत्री अशिता धवनला वाण देताना दिसते आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	
	अंकिताने अगदी मराठमोळ्या पद्धतीने सर्व चालीरीतींप्रमाणे हा उत्सव साजरा केला आहे.