सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:27 IST)

अन्नू मलिकला इंडियन आयडॉलमधून पुन्हा काढून टाकले, हे आहे कारण

महिलांना योग्य पद्धतीने वागवले नाही किंवा त्यांना मान सन्मान दिला नाही तर मोठी किंमत मोजावी लागते, असाच पुन्हा प्र्त्येय आला आहे. आता संगीतकार अनू मलिक याची सोनी टीव्हीवरील संगीत शो इंडियन आयडॉलमधून पुन्हा एकदा हकालपट्टी केली आहे. मलिक वर #Me Too मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे इंडियन आयडॉल शोमधून त्याला काढले आहे. 
 
#Me Too मोहिमेअंतर्गत मलिक वर प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्रा ने लौंगिक शोषणाचे आरोप केले. त्यामुळे मलिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. पण या टीकेनंतरही मलिकाला शो चे जज बनवण्यात आले होते. यामुळे अनेकांनी सोनी टीव्हीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच सोनी टीव्हीवर मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव निर्माण केला होता. त्यामुळे मलिकला हा शो सोडावा लागला आहे.