शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2017 (12:03 IST)

अनुपम खेर साकारणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चित्रपट येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. २०१४ साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केले होते. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असून, याचा पहिला लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता यांनी लिहिली आहे.