बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (16:20 IST)

Anushka Sharma Birthday: अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीची रोमँटिक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का शर्माच्या वाढदिवशी तिचा नवरा विराट कोहलीने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोहलीने लिहिले की, "मी तुझ्यावर प्रत्येक स्थितीत प्रेम करतो आणि तुझ्या सुंदरतेवर आणि बालिशपणावर असेच प्रेम करत राहीन. तूच माझी सर्वस्व  आहेस आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
या जोडप्याने 11 डिसेंबर 2017 रोजी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत इटलीमध्ये लग्न केले आणि नंतर भारतात या जोडप्याने दिल्ली आणि मुंबई येथे भव्य रिसेप्शन आयोजित केले ज्यात सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आज अनुष्का शर्मा तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या जोडप्याच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. 
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट खूपच रंजक होती. 2013 मध्ये एका अॅड शूटच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. 
 
2014 मध्ये विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले होते. हा सामना पाहण्यासाठी अनुष्काही पोहोचली होती. शतक पूर्ण केल्यानंतर विराटने स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला फ्लाइंग किस दिला. या सामन्यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्काचे लग्न झाले. विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेले विराट-अनुष्का जोडपे एका मुलीचे पालक आहेत. विराट अनुष्काच्या जोडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे दोघेही प्रत्येक पावलावर एकमेकांच्या पाठीशी उभे राहून पूर्ण साथ देताना दिसतात. 
 
Edited By - Priya Dixit