सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (14:32 IST)

अनुष्काने मानले फ्रंर्टलाइन वर्कर्सचे आभार

आरोग्सेवक आणि फ्रंटलाइन वर्कर्स या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माने एक नोट लिहून त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कोरोना रुग्ण, डॉक्टर्स, पोलीस दिसत आहेत. अनुष्का म्हणते, आमचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणार्या  फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्सेवकांना धन्यवा. भारत देश तुमच्यासोबत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, आम्ही आरोग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांचे योगदान खरेच प्रेरणादायी आहे.
 
देशासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात आणि त्यासाठी आम्ही तुमचे कायम कृतज्ञ असू. माझ्यासाठी, विराटसाठी आणि देशासाठी तुम्ही खरे हिरो आहात. पुन्हा एकदा धन्यवाद.