1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (22:32 IST)

धन्यवाद रोहीत भाऊ, असा रिप्लाय देत अमृता फडणवीस यांनी मानले रोहित पवारांचे आभार

Amrita Fadnavis replied to this tweet today Thank you Rohit Bhau
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  यांनी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला अमृता फडणवीस यांनी आज रिप्लाय दिला आहे. धन्यवाद रोहीत भाऊ, असा रिप्लाय देत अमृता फडणवीस यांनी रोहित पवारांचे आभार मानले आहेत. 
 
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लाँच करण्यात आलं होतं. 'कुणी म्हणाले वेडी मुलगी' असं शिर्षक असलेलं गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. ते ऐकल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं होतं. 
 
"काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करुनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.