मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (17:13 IST)

सचिन वाझेंची अडीच तास पोलीस आयुक्तांशी चर्चा; बदलीच्या प्रश्नावर

Sachin Waze
राज्यात अनेक प्रश्न गाजत आहेत. त्यात आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या चर्चेत आले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात सर्वात प्रथम सचिन वाझेंचा उल्लेख केला आणि सोबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. नंतर विरोधकांनी या मुद्यावरुन अधिवेशनात सरकारला घेरलं होत तर  ठाकरे सरकारने अखेर सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सचिन वाझे या सर्व घडामोडींदरम्यान पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.
 
सचिन वाझे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तब्बल अडीच तास पोलीस आयुक्त आणि सचिन वाझेंमध्ये चर्चा सुरु होती. सचिन वाझे भेटीनंतर प्रसारमाध्यमांसमोर आले होते. यावेळी त्यांना भेटीत नेमकी काय चर्चा झाली? तसंच बदलीच्या कारवाईसंबंधी विचारण्यात आलं असता सचिन वाझे यांनी बोलण्यास नकार दिला. मी माझं स्टेटमेंट थोड्या वेळात सर्वांना देणार आहे इतकं सांगून ते निघून गेले.