मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (07:57 IST)

वाचा, आरोपानंतर सचिन वाझे यांची प्रतिक्रिया

मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरून भाजपाने आक्रमक होत सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यावर सचिन वाझे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “माझ्यावरच्या आरोपांबाबत मला अजून काहीही माहिती नाही. नेमके आरोप काय आहेत हे कळल्यानंतरच मी माझं मत मांडेन.” तसेच,“मनसुख हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यामध्ये काय गुन्हा आहे? गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का? यात नेमका आरोप काय?” असा सवाल वाझे यांनी उपस्थित केला आहे.
 
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी नोंदवलेल्या जबाबासंदर्भात वाझे यांना विचारलं असता, त्यांचा जबाब मी वाचलेला नाही असं त्यांनी सांगितली. तसेच, त्यांचा जबाब मी अगोदर वाचतो आणि मग यावर उत्तर देतो असं देखील यावेळी वाझे म्हणाले.