बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (22:18 IST)

दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षाच्या तारखा जाहीर

दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबद्दलच्या सूचना महाराष्ट्र शिक्षममंडळाने दिल्या आहेत. त्यासाठी गरजेचे असणाऱ्या सर्व उपाय योजना करुन या परीक्षा घेण्यात याव्यात अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या.बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 5 ते 22 एप्रिल तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहेत. 
 
दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी 1 लाख 83 हजार 611, तर बारावीच्या 1 लाख 51 हजार 847 अशा एकूण 3 लाख 35 हजार 458 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचे करण्याच्या सूचना राज्य मंडळाने शाळा आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.