मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 10 मार्च 2021 (22:06 IST)

यंदाचे पुण्याचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार

सध्या सर्वत्र महाराष्ट्रात कोरोनाने उच्छाद मांडला आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी लॉक डाऊन लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीला आणि कोरोनाबाधितांची संख्या बघता यंदाच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 19 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पुढे ढकलण्यात आले असून आता हे महोत्सव ऑनलाईन पद्धती ने होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
हा आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या 18 मार्च ते 24 मार्च होणार अशी माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे. 
डॉ. जब्बार म्हणाले की यंदाच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढ मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 
आयोजक म्हणून जास्तीत जास्त चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे अशी इच्छा बाळगतो. मात्र सध्याच्या कोरोनाच्या स्थितीला बघता हे कितपत शक्य होईल हे जाणता काही दिवसांसाठी हे महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहे.  
आता हे महोत्सव ऑनलाईन पद्धतीने होणार. ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन महोत्सवात भाग घ्यायचे आहे त्यांनी 'पिफ 'च्या  www.piffindia.com या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.