शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

लिंबू पाणी पिण्याचे 15 फायदे जाणून घेऊ या

लिंबू पाणीला देशी कोल्डड्रिंक म्हणा तरी काहीही चूक नाही . प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन आणि खनिजने समृद्ध असलेले हे पेय आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित फायदे देतात. चला तरी मग लिंबू पाण्याचे इतर फायदे जाणून घेऊ या. 
 
1 लिंबू विटमिन सी चे चांगले स्रोत आहे. या मध्ये इतर व्हिटॅमिन्स जसे की थायमिन, रायबोफ्लॅविन, नियासिन, व्हिटॅमिन बी -6 फोलेट आणि व्हिटॅमिन ई थोड्या प्रमाणात आढळतात. या मुळे घसा खराब होणे,बद्धकोष्ठता किडनी आणि हिरड्यांच्या समस्येपासून आराम देतो. रक्तदाब आणि तणाव देखील कमी करतो. त्वचा निरोगी बनविण्यासह लिव्हरसाठी देखील चांगले आहे. 
 
2 पचन क्रिया संतुलित करण्यात आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी  हे मदत करते. या मध्ये अनेक प्रकारचे खनिजे जसे मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जिंक आढळते. 
 
3 मूतखडा मध्ये देखील हे आरामदायक आहे.लिंबू पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होण्यात मदत मिळते. हे युरीन पातळ करण्यात मदत करतो.
 
4 मधुमेह असल्यास किंवा वजन कमी करायचे असल्यास साखरेच्या पातळीला न वाढवता शरीराला रिहायड्रेट करून ऊर्जा देतो. 
 
5 पचन क्रियेस फायदेशीर आहे लिंबू पाण्यात असलेला लिंबाचा रस हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पित्त स्त्राव तयार करतो. हे पचनासाठी आवश्यक आहे. ऍसिडिटी आणि संधिवाताचा धोका कमी होतो. ज्यांना ओटीपोटात वेदना होणं, जळजळ होणं आणि गॅसचा त्रास असल्यास त्यांनी आवर्जून लिंबू पाण्याचे सेवन करावे.  
 
6 बद्ध कोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबू पाणी फायदेशीर आहे. दररोज कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या आणि संपूर्ण दिवस बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहा. 
 
7 प्रतिकारक शक्ती वाढवतो.लिंबूपाणी बायोफ्लाव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रिएंटचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रतिकारक शक्ती वाढवतो.या मध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि खनिजे ऊर्जेची पातळी वाढविण्यात मदत करतात. 
 
8 घसा खराब असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने घसा बरा होतो.
 
9 वजन कमी करण्यासाठी दररोज मधासह कोमट पाणी प्यायल्याने जास्तीचे वजन कमी करू शकतो. 
 
10 हिरड्याच्या त्रासांमध्ये देखील आराम मिळतो लिंबू पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. 
 
11 कर्करोगापासून बचाव करण्यासाठी लिंबूपाणी पिणे फायदेशीर आहे. लिंबाचा अँटी ट्यूमर गुणधर्म असतात जे कर्करोगाच्या धोक्याला कमी करतो.
 
12 तणाव आणि रक्तदाब कमी करतो या मुळे थकवा कमी होतो आणि त्वरित आराम मिळतो. 
 
13 त्वचेची काळजी घेण्यासाठी हे उत्तम मानले आहे. या मुळे त्वचा तरुण दिसते. लिंबू हे अँटी ऑक्सिडंटने समृद्ध आहे. त्वचेला तरुण आणि सुंदर बनवते. 
 
14 अतिसार सारख्या समस्येमध्ये देखील फायदेशीर आहे मासिक पाळीमध्ये देखील महिला तीन चे चार लिंबाच्या रसाचे सेवन करून या त्रासापासून सुटका मिळवू शकतात. 
 
15 चांगल्या आरोग्यासाठी नेहमी जास्त पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. काही लोकांना पाणी पिणे आवडत नाही कारण त्याला काहीच चव नसते. आपण पाण्याच्या ऐवजी लिंबू पाणी पिऊ शकता. हे चवीला चांगले आणि ऊर्जा देणारे आहे तसेच पाणी आणि लिंबू दोन्ही मिळतात जेणे करून आपण निरोगी राहता.